खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

चिखली तालुका संवाद दौरा बैठक उत्साहात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली (प्रतिनिधी)
आरुना दत्तात्रय खंडागळे

काँग्रेस पक्षवाढीसाठीच अहोरात्र झटणार :  संदिप दादा शेळके

चिखली :  माजी आमदार दिवंगत बाबुराव पाटील, उत्तमराव पाटील यांचा नातू असल्यामुळे जुन्या विचारांशी, पक्षाशी मी पुन्हा जुळलो. मला लोक विचारतात की, तुम्ही आता जिल्हाध्यक्ष होणार का ?  मी सर्वांना ठामपणे सांगत आहे, प्रदेशाध्यक्ष. हर्षवर्धन दादा सपकाळ व जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या आदेशाने मी संवाद यात्रा सुरु केली असून  मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, फक्त काँग्रेस पक्ष वाढीसाठीच अहोरात्र झटणार, असल्याचा निर्धार काँग्रेसनेते संदिप दादा शेळके यांनी व्यक्त केला.

बुधवार २५ मार्च रोजी चिखली येथील हिरकणी महिला अर्बनमध्ये तालुकानिहाय बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना संदिप दादा शेळके म्हणाले की,  लोक मला विचारत आहेत, तुमच्या बॅंका आहेत, त्रास होणार नाही का ? तर मी त्यांना सांगतो की, आमच्या पूर्वजांनी इंग्रज राजवटी सारखा कठीण त्रास सोसला. आता तर सर्व सुविधा आहेत. त्यामुळे जेलमध्ये जावे लागले, तरी चालेल… पण काँग्रेस विचार सोडणार नाही.

यावेळी  तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, न.प.विरोधी पक्षनेते डॉ. मोहमंद इसरार, सचिन बोंद्रे, अतहरोद्यीन काझी,  पर्यावरण सेलचे विजु पाटील शेजोळ, नगरसेवक गोपाल देव्हडे, जक्का भाई, गोकुळ शिंगणे, रत्नदिप शिनगारे, प्रशांत भटकर, समाधान सुपेकर, पांडुरंग पाटील भुतेकर, खलील बागवान, शेख खैरू, ईश्वराव  इंगळे, जिवनबापु देशमुख, शिवराज पाटील, शेषराव अंभोरे, अशोक झगरे, रामधन मोरे, कापडसिंग पाटील, गणेश जवंजाळ, समाधान आकाळ, गणेश ठेंग, विजय वाघमारे सर, भास्कर चांदोरे, समाधान गिते, प्रविण, पाटील, राहुल चवरे, डॉ. संजय घुगे, रवि लोखंडे, संजुकाका बाहेकर, रूपेश घोलप, विजय महाजन, श्रीकृष्ण अंभोरे यांच्यासह शेकडो काँग.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button