मुक्ताईनगरला मानवाधिकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार!

मुक्ताईनगरला मानवाधिकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार!
मुक्ताईनगर: प्रतिनिधी- येथील शासकीय विश्रामगृहात प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेची बैठक दिनांक 12 फेब्रुवारी रोजी झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मोहन मेढे होते तर व्यासपीठावर तालुका अध्यक्ष भास्कर जंजाळकर,सचिव हकीम चौधरी, उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर,तालुका कार्याध्यक्ष बी. डी.गवई, जिल्हा संघटक मोतीलाल जोगी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीत सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे तालुका सचिव हकीम चौधरी यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले. व सूत्रसंचालन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. मानवाधिकार संघटनेचे नूतन पदाधिकारी जिल्हा संघटक ज्येष्ठ पत्रकार मोतीलाल जोगी, सदस्य जितेंद्र चौधरी,चेतन सुरडकर,शिवाजी कठोरे यांना ओळखपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन मेढे यांनी आजच्या समस्यांबाबत व महिला अत्याचाराबाबत माहिती देऊन संघटनेने जागरूक राहून गरज तेथे मदत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी मोतीलाल जोगी बि.डी. गवई, राजेंद्र वानखेडे, भास्कर जंजाळकर, समाधान पाटील, हकीम चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जगदेव इंगळे, रामदास सुतार प्रा. डॉ. छाया ठिगळे, राजकुमार जैन, चंद्रकांत रावये, धनंजय सापधरे, चेतन सुळोकार, सुपडू बोदडे, दयाराम पाटील,विजय खराटे, विनोद खराटे आधी उपस्थित होते. आभार भास्कर जंजाळकर यांनी मानले.



