गुन्हेगारीजळगावा जिल्हा

मुक्ताईनगर पोलिसांची अवैध दारूविरोधात ठोस कारवाई; १८ लिटर हातभट्टी दारू जप्त

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूविक्री व साठ्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणखी एक प्रभावी कारवाई केली आहे. दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता सुकळी, ता. मुक्ताईनगर येथे आरोपीच्या राहत्या घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 036/2025 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अरुण श्यामराव कवडे (वय ३०, रा. सुकळी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे २० लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये १८ लिटर हातभट्टीची तयार दारू आढळून आली असून, तिची अंदाजे किंमत १,८०० रुपये आहे. सदर दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत बोदडे, विजय पढार ,दीपक ढाकरे ,श्रीकृष्ण देशमुख, अजय खंडेराव ,गोविंदा सुरवाडे , संजय पवार यांच्या पथकाने कारवाई केली होती.

सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार पवन सुरेश सपकाळ यांनी केली असून, पोलीस निरीक्षक आशिष आरसूळ यांच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे.

अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याने अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा मुक्ताईनगर पोलिसांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button