सरदार जी. जी. विद्यालयाच्या सिद्धार्थची गगनभरारी ——

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी :-विकास आमोदकर
(रावेर)—–येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी .जी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात चि.सिद्धार्थ चंद्रमणी गजरे या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला .
सिद्धार्थने इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण सरदार जी. जी .हायस्कूल मध्ये घेतल्यानंतर पुढे अकरावी बारावीनंतर NIT नागपूर येथे इंजिनिअरिंग पूर्ण करून DRDO,नागपूर येथे नोकरी करत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी )परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण भारतातून ५० वा क्रमांक पटकावला आणि वर्ग एक अधिकारी म्हणून त्याची निवड करण्यात आली, त्यानिमित्ताने सरदार जी .जी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सिद्धार्थ चंद्रमणी गजरे या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
तसेच रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या वतीने देखील सिद्धार्थ चंद्रमणी गजरे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. देवेंद्र मिसर ,उपाध्यक्ष श्री. राजेंद्र आठवले ,चेअरमन श्री. संतोषशेठ अग्रवाल ,संस्थेचे सदस्य श्री .शैलेंद्रकुमार देशमुख ,श्री .तुषार मानकर , उज्वल अग्रवाल, श्री. महेश अत्रे ,श्री .विजय लोहार, शाळेचे मुख्याध्यापक श्री .बी. आर. महाजन ,सौ. के. एस.गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ .एच. एस .कोल्हे ,सरदार जी. जी. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. शैलेश राणे आदि उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना सिद्धार्थने “कन्सिस्टन्सी अत्यंत महत्त्वाची आहे “असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला .यावेळी सिद्धार्थची बहीण डॉ.राजेश्वरी चंद्रमणी गजरे हिचा देखील गौरव करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. श्री. बी .आर .महाजन अध्यक्षस्थानी होते .तर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्री. एस .आर. राणे ,ज्येष्ठ शिक्षक श्री. बी .एल .सरोदे, ज्येष्ठ शिक्षिका सौ.के. ए. नाईक, सौ .आर .बी .सरोदे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चि.सिद्धार्थ चंद्रमणी गजरे हे सरदार जी .जी .हायस्कूलच्या माजी प्रभारी मुख्याध्यापिका कै.जे .सी. गजरे आणि कै. चंद्रामणी गजरे एलआयसी विकास अधिकारी यांचे चिरंजीव होत .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक श्री .आर. आर. उपाध्ये यांनी केले. यावेळी विज्ञान विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



