Uncategorizedमहाराष्ट्र

तणनाशक कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक

भाजप तालुका उपाध्यक्ष गजानन गायकवाड यांची तक्रार
वार्ताहर.
भाजपचे तेल्हारा तालुका उपाध्यक्ष व तेल्हारा येथील शेतकरी गजानन गायकवाड यांनी निश्चिनो कंपनीचे नऊ हजार रुपये किमतीचे स्टीग्मा बुस्ट व स्टीग्मा स्प्रेड स्टिकर आणि ऍक्टिवेटर शिपू याची जमिनीत भरपूर ओलावा असतांना 30 जुन रोजी सोयाबीनच्या शेतात फवारणी केली. तणनाशकाचे प्रमाण सुद्धा कंपनीने सांगितले तेवढेच घेतले. फवारणी करून आठ दहा दिवसानंतर सुद्धा त्यांच्या शेतातील तण जळाले नाही वा त्यावर काहीच परिणाम दिसून आला नाही. याबाबत गजानन गायकवाड यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेताची पहाणी करण्यासाठी बोलावले असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली.व पुन्हा फवारणी करावी लागेल असे उत्तर दिले. गायकवाड यांचा अगोदरच फवारणी औषधीचे नऊ हजार व फवारणीचे तीन हजार असा एकूण बारा हजार रुपये खर्च झाला आहे. अगोदरच शेतीचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामध्ये ह्या कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात. तरी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई व्हावी आणि इतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गजानन गायकवाड यांनी कृषी विस्तारक अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांच्याकडे बिलासह लेखी तक्रार केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button