मुक्ताईनगर

जिल्ह्यातील सर्व आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत काय भूमिका मांडली त्याची लिखित माहिती मा.जिल्हाधिकारी अथवा मा. तहसीलदार यांचे मार्फत मिळणे बाबत मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाने तालुकाध्यक्ष जितेंद्र सावळे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना दिल निवेदन:-

सविस्तर वृत्त असे की याआधी 7 ऑक्टोबर 2024 तसेच 24 व 25 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे मार्फत महाराष्ट्राचे मा. राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय कृषिमंत्री व विविध मतदार संघाचे मा. खासदार व मा. आमदार यांना निवेदने देऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनावर स्तरावर निर्णय घेण्याची मागणी केली होती परंतु यावर कुठलीही कार्यवाही केली गेली नाही त्या अनुषंगाने नऊ एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलनही करण्यात आली होती यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचे लेखी उत्तर देण्यात आले नाही किंवा मागण्याही मान्य करण्यात आल्या नाही आज राष्ट्रीय किसान मोर्चा ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जे जे लोकप्रतिनिधी आपण आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेच्या सभागृहात आपल्या मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे अपेक्षित असल्यामुळे आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडले असतीलच असा विश्वास आहे म्हणून आपण आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सभागृहांमध्ये जी आपली भूमिका मांडली आहे याची नोंद सभागृहातील रेकॉर्डला असेलच तरी याची एक प्रत माननीय जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांचे मार्फत आम्हास देण्यात यावी जर सभागृहात बाजू मांडली नसेल तर आपण सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलला नाही याबाबत लिखित खुलासा देण्यात यावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे जर याआधी दिलेले निवेदनांची प्रत आपल्याला मिळाली नसेल तर ती मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन आपण शेतमालाच्या भावाबाबत शेतकरी रक्कम व भावांतर मूल्य फरकाचे रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या नावे जमा करण्याची व्यवस्था करावी आपले म्हणणे सभागृहात मांडावे तसेच निवेदन प्राप्त झालेल्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत राष्ट्रीय किसान मोर्चा ने दिलेल्या निवेदनाबाबत आपण आपले म्हणणे जे सभागृहात मांडले असेल त्याची झेरॉक्स प्रत आम्हाला देण्यात यावे जर काही कारणास्तव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आपले म्हणणे सभागृहात मांडले नसेल तर आपण का मांडले नाही याबाबत सकारण लेखी खुलासा देण्यात यावा आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बोलत नाही त्यामुळे आपण आमदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहात याची खात्री करत आपण पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे यासाठी आपण ताबडतोब आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे यासाठी गाव पातळीवर ठराव मंजूर करून माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवण्यात येतील व आपणास पदमुक्त करण्याची विनंती करण्यात येईल व यासाठी महाराष्ट्रभर राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे अभियान चालवले जाईल कधीही आपण याची दखल न घेता निवेदनाबाबत टाळाटाळ केली तर दिनांक एक जुलै 2025 रोजी निष्क्रिय आमदारांनी राजीनामे द्यावेत याकरिता महाराष्ट्र बंद करण्यात येईल कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्व जबाबदारी शासनाने प्रशासनाची असेल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र सावळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले याप्रसंगी प्रमोद सौंदळे, शिवाजी महाजन, योगेश मराठे, किशोर महाजन, संजय पाटील, जितेंद्र पाटील, विकास पाटील, भूषण पाटील, प्रमोद पाटील, विशाल नारखेडे, दीपक पाटील, चंदन पाटील, कन्हैया पाटील, शुभम पाटील, विपुल पाटील, नीना पाटील, भावेश लोंढे आधी शेतकरी बांधव उपस्थित होते..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button