Uncategorized
नायगाव येथील सरपंच उपसरपंच अविश्वास प्रस्ताव प्रकरण चिघळणार दिला बेमुदत उपोषणाचा इशारा :- ( प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगांव येथे ग्रुप ग्रामपंचायत नायगांव मधील १) सुपडाबाई रघुनाथ भालेराव २) विशाल पंडित पोहेकर ३) गोपाल कृष्णा न्हावी ४) ललिता संजय कोळी ५)प्रमिलाबाई मनोहर पाटील ६) भगवान चुडामन भील व ७) पुताबाई लक्ष्मण भील या ९ पैकी ७ सदस्यांनी सरपंच १)मोनाली किशोर महाजन व उपसरपंच २)महेश दत्तू पाटील या दोघांवर दिनांक १६ /०४ / २०२४ रोजी मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या कडे अविश्वास दाखल केला होता त्या अविश्वासाची सुनावणी व मतदान घेणे कामीतहसीलदार यांनी दिनांक २३/०४/२०२४ रोजी नायगांव येथे सभा बोलावून संविधानिक पद्धतीने ९ पैकी ७ सदस्यांनी बहुमत सिद्ध करून अविश्वास पारित केलेला असून सरपंच व उपसरपंच पद रिक्त आहे त्याबाबत दिनांक २/५/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी सो. व दिनांक ३/५/२०२४ रोजी मा.उपविभागीय अधिकारी सो. भुसावळ यांच्या कार्यालयात सरपंच व उपसरपंच पद रिक्त असून सरपंच निवडणूक घेण्यात यावी असा अहवाल पाठविण्यात आलेला आहे तसेच सदर विषयात मा.जिल्हाधिकारी व मा.न्यायालयाने कुठलेही स्थगिती आदेश दिलेला नसल्याचे पत्र गट विकास अधिकारी यांच्या मार्फत दिलेला असून आज पर्यंत सरपंच निवडणूक घेतली नसून चुकीच्या पद्धतीने प्रकरणास दिशा दिल्याचे प्रमोद भालेराव यांनी निवेदनात म्हटले आहे तसेच तहसीलदार कार्यालय मुक्ताईनगर, उपविभागीय अधिकारी कार्यालय भुसावळ व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकारी या प्रकरणात कुठलीही मातीही देण्यास टाळाटाळ करतात तसेच उडवाउडवीची उत्तरे देतात व निव्वळ वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप प्रमोद भालेराव यांनी केला आहे तसेच सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास पारित झाल्यावर १ महिन्याच्या आत सरपंच निवडणूक घ्यावी लागते परंतु या प्रकरणात तसे काहीही झाले नसून आज २ ते अडीच महिने उलटले असून सरपंच निवडणुकी संदर्भात कुठलाही निर्णय मिळाला नसून सदर प्रकरणी येत्या आठवडे भरात संविधानिक पद्धतीने सरपंच निवडणूक घेवून १) सुपडाबाई रघुनाथ भालेराव २) विशाल पंडित पोहेकर ३) गोपाल कृष्णा न्हावी ४) ललिता संजय कोळी ५)प्रमिलाबाई मनोहर पाटील ६) भगवान चुडामन भील व ७) पुताबाई लक्ष्मण भील या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना न्याय देण्यात मिळावा अशी तक्रार केली असून आठवडे भारत निर्णय न दिल्यास बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे



