शिवसेनेने घेतली पावसाळ्यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी

सोमवार दि.26/05/2025
शिवसेनेने घेतली पावसाळ्यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी
कित्येक महिन्यांपासून ठाणे जिल्हा,दिवा बी.आर.नगर येथील ‘साई सद्गुरू चाळी पासुन ते सरस्वती बिल्डिंग’ पर्यंतच्या बाजुने वहाणा-या ठा.म.पालिकेच्या नाल्याची साफसफाई न झाल्यामुळे सदर नाल्यामध्ये घाण,कचरा पडून नाल्याचे पाणी चाळींमध्ये घुसत होते.त्याचाच परिणाम डासांचे प्रमाण खुपच वाढले होते.त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये ‘रोगराई’ मोठ्या प्रमाणात होईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
येथील नागरिक संपूर्ण घाबरून गेले होते. हि बाब सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व, उपविभाग प्रमुख) यांनी मा.रमाकांत मढवी साहेब(मा.उपमहापौर/शिवसेना दिवा शहर प्रमुख),सौ.दिपालीताई भगत (मा. नगरसेविका) आणि आमचे अधारस्तंभ मा.उमेश अशोक भगत साहेब(शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांच्या निदर्शनास आणुन देताच,या शिवसेनेच्या पदाधिका-यांनीही नागरीकांच्या आरोग्याची गांभीर्याने दखल घेऊन, नाले साफसफाई खात्याला कळऊन,‘नाल्याची साफसफाई करून घेतली’
त्यामुळे येथील रहिवाशी शिवसेनेचे तसेच सर्व पदाधिका-यांचे आभार मानत आहेत.
सदर नाल्याची साफसफाई व्यवस्थित व्हावी यासाठी सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख),तसेच तेथील रहिवाशी महिलावर्ग आणि समाज सेवक श्री.दिपक महादेव पाटील हे उपस्थित होते.
शब्दांकन,सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख)
या नालेसफाईची काही क्षणचित्र



