खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणाबोदवडभुसावळमहाराष्ट्रमुक्ताईनगर

डॉ. जगदीश पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

मुक्ताईनगर : डॉ. जगदीश पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संचालक संस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.व प्राचार्य डॉ. योगेश सोनवणे यांनी देखील दीप प्रज्वलन केले यावेळी विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महापुरुषांच्या विचारांवर मनोगत व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांचा आचरणात अंगीकार करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे, असा संदेश प्राचार्य डॉ. योगेश सोनवणे यांनी दिला.

कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button