महाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

महाविद्यालय कुर्हा काकोडा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अर्जुन गोरले

14 /04 /2025 रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुर्हा काकोडा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली . त्या प्रसंगी प .पु माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थचे अध्यक्ष शिवलकर सर, संस्थेचे सचिव कुलकर्णी सर, संस्थेचे सदस्य बढे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य पिंगळे सर व अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य कोथळकर सर, उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवलकर सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले .त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. नंतर संस्थेचे सचिव श्री भालचंद्र कुलकर्णी सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले

.नंतर अध्यक्ष श्री प्रमोद जी शिवलकर सर यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा .न्हावी सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कार्यक्रम महिला अधिकारी शिमरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ.जितेश कुलकर्णी सर ,प्रा .अमोल नाफडे सर ,प्रा .अर्जुन गोरले सर,व प्राध्यापिका योगिता पाटील मॅडम, भाग्यश्री ढगे मॅडम, तसेच गजानन दादा गलवाडे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button