जी.बी.एस. आजाराने ग्रस्त सोनाली पाटीलच्या प्राणवाचवणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार

जळगाव – नादुखेडा, ता. रावेर येथील सोनाली योगेश पाटील या बालिकेला गंभीर आजार गुईलन बॅरे सिंड्रोम (G.B.S.) झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (G.N.C.), जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आयसीयू वॉर्ड क्रमांक ४ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या निर्देशानुसार व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने या बालिकेचे प्राण वाचवण्यात यश आले.
या यशस्वी उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. उपचार देणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉ. गिरीश राणी, डॉ. इंद्रायणी मिश्रा, डॉ. कौस्तुभ चौधरी, डॉ. नेहा चांडक, डॉ. अनिरुद्ध करंडे, डॉ. सुरसिंग पावरा, डॉ. रितेश पांडे, डॉ. शुभम चव्हाण, डॉ. महेश पाटील, डॉ. रुएल लुस्बो, डॉ. पवन रेड्डी आणि डॉ. कृतिका पांडे यांचा समावेश होता.
या सर्व डॉक्टरांचा मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे P.A. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख (रावेर लोकसभा) पवन भाऊ सोनवणे, शिवसेना सोशल मीडिया मुक्ताईनगर विधानसभा प्रमुख सोनू भाऊ तायडे,



