राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार इयत्ता तिसरी, चौथी व सहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या संग्रामपूर तालुकास्तरीय प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- ७ ऑगस्ट २०२६
राज्य अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता तिसरी, चौथी व सहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या संग्रामपूर तालुकास्तरीय चार दिवसीय प्रशिक्षणाचा आज जिल्हा परिषद हायस्कूल, संग्रामपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. ३ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री सारंग कुलकर्णी साहेब (गटशिक्षणाधिकारी), श्री मिलिंद सोनोने (गटसमन्वयक), श्री सचिन वडाळ (शिक्षण विस्तार अधिकारी) तसेच श्री कुलदीप बुंदे (केंद्रप्रमुख) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
चार दिवसीय प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ सुलभक म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे श्री भास्कर डोसे,श्री सुनिल नागरगोजे, श्री निलेश पवार, श्री मुकुंद धोरण, श्री योगेश चांदने व श्री विवेक नाणीर यांचा मा. गटशिक्षणाधिकारी श्री सारंग कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी भोजन व्यवस्था व प्रशासकीय जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडणारे प्रशिक्षण समन्वयक श्री गुणरत्न वानखडे, श्री किशोर इंगळे व श्री सहारे यांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मा. श्री सारंग कुलकर्णी साहेब यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील अभ्यासक्रम आराखड्याच्या अपेक्षा स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दर्जाची कौशल्ये, संवेदनशीलता, सर्जनशीलता, चिकित्सक विचारशक्ती (Critical Thinking) व जाणीव-जागृती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. पुनर्रचित अभ्यासक्रम कृतीयुक्त, आनंददायी व विद्यार्थी-केंद्रित पद्धतीने प्रभावीपणे राबविण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी श्री मिलिंद सोनोने सर यांनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणातील आशय घटकाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली. श्री सचिन वडाळ सर यांनी विद्यार्थी सुरक्षा, अभ्यासक्रम आराखडा आशय घटकाचे महत्त्व विशद केले.
प्रशिक्षणादरम्यान सुलभकांनी दिलेल्या आशयघटकांबाबत प्रशिक्षणार्थी म्हणून श्री गिरीश इंगळे सर व शहाणे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त, परिणामकारक व प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण चार दिवसीय प्रशिक्षण शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन, स्वादिष्ट भोजन, चहाच्या उत्तम सुविधांसह आनंदी व उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. प्रशिक्षणामुळे शिक्षकांना पुनर्रचित अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक दिशा व प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली…….✍️



