अकोला येथील पत्रकारावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिवरखेड ठाणेदारांना निवेदन .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे जिल्हा प्रतिनिधी अकोला
हिवरखेड : दि. 22
तिन दिवसा आधी अकोला येथील मोठ्या वृत्त समूहातील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महाले यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला त्या निषेधार्थ हिवरखेड येथील आदर्श पत्रकार संघाच्यावतीने हिवरखेड पोलीस स्टेशनला शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी निवेदन देण्यात आले. विठ्ठलराव महाल्ले यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर शासन व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढणे ही गंभीर बाब असून एक प्रकारे हा सरळ लोकशाही वरच हल्ला असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे.
या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली असे न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
सदर निवेदन पोलीस उपनिरिक्षक श्रीराम जाधव, प्रफुल पवार, दीपक ढोले आकाश गजभर ,धीरज साबळे यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी आदर्श पत्रकार संघाचे धिरज बजाज , सुरज चौबे, संदीप इंगळे, राजेश पांडव, अनिल कवळकर, अर्जुन खिरोडकर , जितेश कारिया यांच्यासह आदि पत्रकार बंधु उपस्थित होते.



