बुलढाणामहाराष्ट्र

तूर खरेदी नोंदणीस 15 दिवसांची मुदतवाढ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तूर खरेदी नोंदणी करिता 8 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. असे आदेश शासनाने जाहीर केले आहे. तूर खरेदीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल इतकीही नोंदणी न झाल्याने अखेर तूर नोंदणीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दरम्यान तीन दिवस आलेल्या शासकीय सुट्ट्या बघता प्रत्यक्ष बारा दिवस नोंदी होणार आहे. सोयाबीन प्रमाणे हमीदराने नाफेडच्या माध्यमातून शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीची ही मुदत 24 मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
प्रत्यक्षात आता तूर खरेदी 13 मे पर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करण्याकरता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, सातबारा उतारा, पिक पेरा व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देऊन तूर खरेदी करता ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button