शेतकऱ्यांच्या शेतीत हरभरा तूर या पिकाचं जंगली जनावरामुळे प्रचंड नुकसान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या शेतीत हरभरा तूर या पिकाचं जंगली जनावरामुळे प्रचंड नुकसान होत आहे, अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीत भेट देऊन आम्ही पाहणी करून वन विभागाकडे मागणी केली आहे,शेतकऱ्यांच्या शेतीत पेरलेल्या हरभरा पिकामध्ये रानडुकराचा अनेक जंगली जनावराचा हैदोस सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतलं हातात आलेलं पीक जंगली जनावरांनी उध्वस्त केलं आहे,आकोट,तेल्हारा,बार्शीटाकडी, बाळापूर,पातुर,मुर्तीजापुर,या भागातील शेतकऱ्यांना या जंगली जनावराचा अतिशय त्रास वाढला आहे.दिवसभर शेतात कष्ट करायचे आणि रात्रभर शेतात पहारा द्यायचा,अशी परिस्थिती कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर झाली तात्काळ यावर वन विभागाने लक्ष देऊन जंगली जनावराच बंदोबस करावा या त्रासातून शेतकऱ्यांना मुक्त करावे.थंडीचा त्रास व रात्रीचे जागरण करून शेतकरी रात्रभर हरभरा तुर पिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.शेतकऱ्यांच्या शेतीत तूर हरभरा अशा पिकामध्ये माकडे, रानडुक्कर,हरीण जंगली जनावर घुसून हातात तोंडाशी आलेला घास उध्वस्त करत आहे तात्काळ याची दखल वनविभागाने घ्यावे या बिकट परिस्थितीतून शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करावे या चांगली जनावराचा तात्काळ बंदोबस्त करावे अशी आम्ही मागणी करतो अन्यथा वन विभाग कार्यालयात मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो.
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
इळा पिळा टळू दे
बळीराजाचं राज्य येऊ दे



