Uncategorized
बाळासाहेब आंबेडकर यांनी फॉरेन्सिक पोस्टमार्टमची मागणी केली नसती, तर भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे मानले गेले असते. जे की, पोलिस आणि राजकारण्यांना हवं होतं.

तुम्ही ज्या गाढवांना मतदान केले, त्यांनी तुम्ही तुमचं बघून घ्या यासाठी सोडून दिले. त्यांनी याविषयीचा शोकसंदेश ट्विट केला आणि त्यांचे काम संपले.
बाळासाहेब आंबेडकरांनी वकिलांना मार्गदर्शन केले. फॉरेन्सिक पोस्टमार्टमसाठी लढा दिला. सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव परभणीत नेण्यापासून पोलिसांनी अडवलं तेव्हा बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलीस प्रशासनाला फटकारत सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यसंस्कार परभणीत केला. त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली आणि आंबेडकरी वस्त्यात जाऊन पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध केला.
गाढवांनी काय केले?
तुम्हाला संकटात सोडून गेलेली ही गाढवे निवडणूक आल्यावर पुन्हा तुमची मते मागतील.
प्रश्न असा आहे की, तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडून गाढव व्हाल का ?



