Uncategorized
आसलगाव बाजार येथे भर दिवसा लुट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
जळगांव जा 17/12/2024 डिसेंबर प्राप्त माहितीनुसार सुवर्णकार स्वप्निल प्रदीप करे व मधुकर लुले रा वाडोदा ता मुक्ताईनगर जि जळगांव खा. यांच्यावर मंगळवारी सकाळी सुमारे10.45वा धानोरा पळशी सुपो सीतामाता मंदिराजवळ अज्ञात दरोडेखोर लपून बसले होते. सुवर्णकार स्वप्निल प्रदीप करे व मधुकर लुले येताच दरोडेखोरांनी मधुकर लुले यांच्यावर प्राण घातक हल्ला केला त्यातच मधुकर लुले गंभीर जखमी झाले. व स्वप्निल प्रदीप कऱ्हे यांच्या डोक्याला लाठीने वार केला व ते त्यातच जखमी झाले. व दरोडेखोरांनी पाच किलो चांदी 100 ग्राम सोने व दीड लाख रुपये असे एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला



