Uncategorized

विटंबना करणारा जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी प्रा. जोगेंद्र कवाडे

मलकापूर प्रतिनिधी :- (शेख निसार) परभणी येथे संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची झालेल्या विटंबना च्या निषेधार्थ बंदच्या आंदोलनादरम्यान आंबेडकरी अनुयांयावर पोलिसांद्वारे झालेल्या लाठीच्यार्ज व कोंबिंग ऑपरेशन च्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 डिसेंबर सकाळी 11 वाजता रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर यांनी भेट दिली भेटीदरम्यान कवाडे सर यांनी सर्वप्रथम घटनास्थळावर जाऊन संविधान शिल्पाच्या प्रतिकृती ची केलेल्या जागेची पाहणी करून परमपूज्य बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन झालेल्या भीम नगरात भेट देऊन समाज बांधवांना मार्गदर्शन करून व घरोघरी जाऊन जखमींची आस्थेने चौकशी केली व त्यांना धीर दिला
त्यानंतर 1 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पोलीस अत्याचाराचे निंदनीय अमानुष असे प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि अत्याचारी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याचे नागरिकत्व रद्द करण्यात यावे अशी शासनाकडे शिफारस करावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी व एसपींना करण्यात आली आरोपीला मनोरुग्ण म्हणून घोषित करून प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने करू नये अन्यथा त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील असा इशारा दिला त्याच बरोबर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी सोबतच आरोपीची नार्को टेस्ट करावी व निर निरपराध लोकांना अटक केल्या जाऊ नये अशी जोरदार मागणी जिल्हाधिकारी व एस. पी .कडे चर्चा दरम्यान करण्यात आली यावेळी कवाडे सरांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले/ प्रदेश महासचिव बापूराव गजभारे/ परभणी येथील पक्षाचे राज्य संघटक प्राध्यापक गौतम मुंढे/ जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड /हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप भिसे/ सिद्धार्थ गडपालपूर्णा तालुका अध्यक्ष संजय शिंदे अनेक पदाधिकारी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button