क्राईम

अटक न करण्यासाठी मागितली लाच : दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी येथील एका कर्मचाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी पारोळा ते धरणगाव रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सदर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्या वाहनचालकाला अटक न करण्यासाठी या पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोन कर्मचाऱ्यांनी तीस हजार रूपयांची लाच मागितली होती. यात तडजोड होऊन पंधरा हजार रूपयांची लाच देण्याचे निश्चीत झाले. दरम्यान, या व्यक्तीने संबंधीत प्रकरणात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. येथे या प्रकरणाची खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने आज आज पंधरा हजार रूपयांची लाच स्वीकरतांना एका पोलीसाला रंगेहात अटक केली असून दुसरा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पारोळा पोलीस स्थानकात हिरालाल देविदास पाटील ( वय- 43 वर्ष पारोळा पो.स्टे.रा प्लॉट. नं.66, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर); प्रवीण विश्वास पाटील, (वय.45 वर्ष, रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे धुळे येथील निरिक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button