बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

शासनाची उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा! सहभागी होण्याची आज, १५ सप्टेंबर अंतिम मुदत! ५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस! नोंदणी कशी करायची ते बातमीत वाचा….स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसजिल्हा प्रतिनिधीउषा इंगळे बुलढाणा

राज्य शासनाने १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोउत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाचे निवड करण्यात येणार आहे. यासाठी गणेश उत्सव मंडळांना दी.१५ सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.
राज्यभरातील ४४ गणेशोउत्सव मंडळामधून पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २.५० लाख रुपये तृतीय क्रमांकास १ लाख रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु .ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या
mahotsav. plda @&mail.com या ईमेलवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज
pldeshppandekalaacademy.or &
संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळाने भाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच या स्पर्धेत जिल्ह्यातील नोंदणी कृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button