दहा दिवशीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर” सांगता समारोप शिरसोली ता.जळगाव मोठ्या उत्साहात संपन्न झाला,

दि.१५/११/२०२४ रोजी भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा महिला शाखा पूर्व अंतर्गत जळगाव तालुका महिला शाखेच्या विद्यमाने “दहा दिवशीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर” सांगता समारोप शिरसोली ता.जळगाव मोठ्या उत्साहात संपन्न झाला,
कार्यक्रमाचे अध्यक्षपद तालुक्याच्या अध्यक्ष ज्योतीताई दाभाडे यांनी भूषविले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते तथागत भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपांची दीप, धुपाने पूजा करून सामूहिक त्रिशरण, पंचशील ग्रहण केले. उपस्थित मान्यवरांचे तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिबिरार्थी उपासिका यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार, जिल्हा सचिव विद्याताई झनके, जिल्हा सचिव सुषमाताई इंगळे, तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जयपाल धुरंधर, ग्रामशाखा पदाधिकारी संतोष दाभाडे यांनी शिबिराला मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुषमाताई इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन भारतीताई बिऱ्हाडे यांनी केले. ज्योतीताई दाभाडे यांचे अध्यक्षीय भाषण झाले आणि शेवटी सरणतंय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिरसोली येथील निवासी शिबीराच्या वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका आद. सुमित्राताई सर्वटकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष- ज्योतीताई दाभाडे, प्रमुख उपस्थितीत जिल्हा पदाधिकारी प्रियंकाताई अहिरे (जिल्हाध्यक्ष), वैशालीताई सरदार, (जिल्हा सरचिटणीस), सुषमाताई इंगळे (जिल्हा कार्या. सचिव), विद्याताई झनके(जिल्हा संरक्षण सचिव), भारतीताई बिऱ्हाडे (तालुका सरचिटणीस),
संगीताताई सोनवणे (तालुका उपा. संरक्षण), उषाताई सोनवणे (तालुका संघटक), राधाताई जवरे (जळगाव शहर अध्यक्ष), शोभाताई इंगळे (शहर कोषाध्यक्ष), मीनाक्षीताई शेजवळ (शहर उपाध्यक्ष), डॉ. विद्याताई सोनवणे (सामाजिक कार्यकर्ता), राजेश इंगळे (जळगाव तालुका अध्यक्ष), शैलेश सोनवणे (तालुका सचिव), जयपाल धुरंधर (तालुका संघटक), संतोष दाभाडे (शिरसोली ग्रामशाखा पदाधिकारी), डॉ. सचिन नरवाडे (समता सैनिक दल पदाधिकारी) आणि शिरसोली येथील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



