विज पडून एकाचा मृत्यू , दुसरा भाजला.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – तालुक्यातील सुदी शेतशिवारात प्रकाश मनोहर कांबळे (वय ३२) या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज ९ आक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता घडली.
आज दुपारी दरम्यान राजुरा व सुदी गाव शिवारात अचानक विजेच्या कडकडा सह आलेल्या पावसात राजुरा येथील शेतकरी रणजित मोहळे यांचे सुदी रस्त्यावरील शेतशिवारात अचानक विज पडल्याने शेतात सोयाबिनच्या कामासाठी मजूर होते यामध्ये प्रकाश कांबळे वय अंदाजे ३२ वर्ष रा पांढूर्णा जि यवतमाळ हा मजूर जागीच ठार झाल्याची माहिती असून यामध्ये आणखी एक युवक किरकोळ जख्मी झाला तर प्रकाश कांबळे यांचा विज पडल्याने मृत्यू झाला.
तहसिलदार दिपक पुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी पहाणी केली. जऊळका पोलिस उशिराने पोहोचले आणि त्यांनी त्यांचे सोपस्कार करून मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.











