श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे माजी राष्ट्रीय खेळाडू व माजी विद्यार्थी यांच्या शुभहस्ते वूक्षारोपन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि. 6 ऑक्टोबर | तेल्हारा शहरातील सुप्रसिद्ध
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे माजी राष्ट्रीय खेळाडू व माजी विद्यार्थी यांच्या शुभहस्ते वूक्षारोपन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे . तेल्हारा शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे हरित क्रांती सेना या पथकाच्या माध्यमातून शाळेचे माजी विद्यार्थी तथा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री वासुदेवराव नेरकर यांच्या शुभहस्ते वूक्षारोपन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य तथा शाळा समिती सदस्य श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा हे असून अतिथी म्हणून श्री सुधीर बापू देशमुख शाळा समिती सदस्य, सौ. प्रेरणाताई कराळे शिक्षक प्रतिनिधी, अंकेश भांबुरकर हरित क्रांती सेना प्रमुख प्रभारी, सुनिल वंजारी , बी जी पवार , बळीराम कुवारे , भारत भोवर , धनंजय भंगाळे , तेजराव कडू , विजय दहे , एन.सी.सी विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .अस्मिता तायडे हिने केले आहे तर आभारप्रदर्शन अभिनव वानखडे एन.सी.सी विद्यार्थी याने केले आहे.



