स्व संरक्षणातून महिलांनी आपण अबला नसुन सबला असल्याचे दाखवून द्यावे-रोहिणी खडसे

कुऱ्हा येथे संवेदना फाउंडेशन तर्फे स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर संपन्न
मुक्ताईनगर- राज्यात देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत,महिलांना एकट्यात गाठून विकृत,मानसिकतेचे नराधम महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात
अशाप्रसंगी महिलांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक वेळी कोणी मदतीला येईलच असे नाही त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतः चे स्व संरक्षण करता यावे यासाठी स्व संरक्षणाचे धडे आत्मसात करून स्वयंसिद्धा बनण्याची गरज निर्माण झाली आहे
यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे संकल्पनेतून त्यांच्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे कुऱ्हा येथिल शिवाजी हायस्कुल व कै.ग. स. पाटिल उच्च माध्यमिक विद्यालय येथिल विद्यार्थिनींसाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना राजेंद्र जंजाळ यांनी स्व संरक्षणाचे प्रशिक्षण दिले सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना सहभागा बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले
यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या स्त्री ही संपूर्ण जीवसृष्टीच्या निर्मिती व संगोपनात नेहमीच मोलाचा वाटा उचलत आलेली आहे. भारतीय संस्कृती, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, नागरी व्यवस्था, अर्थव्यवस्था, तथा भारतीयांच्या जीवनात तिने नेहमीच अतुलनीय भूमिका बजावली आहे. एका जिवाच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत ती सातत्याने वेगवेगळ्या भूमिकांमधून आपले योगदान सक्षमपणे देत असते. परंतु बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत आज तिच्या सुरक्षितते बाबत काही गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अलीकडे उरण, शिळफाटा, बदलापूर, सिंदखेड राजा,बोपदेव घाट अशा विविध ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचारांच्या अमानुष घटनांमध्ये नराधमांनी विकृततेचा कळस गाठला आहे .अनपेक्षित निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याकरिता व निर्माण होणाऱ्या प्रसंगाला निर्भीडपणे तोंड देऊन नराधमांपासून स्व संरक्षण करण्याची क्षमता निर्माण होण्याकरिता स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करणे माता भगिनींकरता अत्यावश्यक झाले आहे त्याच उद्देशाने प्रेरित होऊन कुऱ्हा येथे स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे शिबिरात सहभागी होऊन स्व संरक्षणाचे धडे आत्मसात केले याचा त्यांना स्व संरक्षणासाठी निश्चितच फायदा होईल.महिला या राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई ,फातिमा शेख यांचा वारसा चालवणाऱ्या वारसदार आहेत म्हणून माता भगिनींनी घाबरून न जाता स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करून स्वयंसिद्धा बनून स्व संरक्षण करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला ठेचुन काढावे व आपण अबला नसुन सबला असल्याचे दाखवून देण्याचे ॲड रोहिणी खडसे यांनी माता भगिनींना आवाहन केले.
तसेच भविष्यात मतदासंघांतील सर्व शाळा कॉलेज व इतर ठिकाणी स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे ॲड.रोहिणी खडसे यांनी सांगितले.
शिबीर यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस. बी.पाटील सर, अमोल गावंडे , एम. एस. पाटील , काकडे सर, जे.एस. पाटील मॅडम, व्ही व्ही पाटील मॅडम, वाडेकर मॅडम, व्ही.एस. पाटील, एच. के.पाटील , दोरकर सर, बोडखे सर
यांनी परिश्रम घेतले



