सौ. कमलाबाई एस. अगरवाल गर्ल्स हायस्कूल, रावेर येथे ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ व ‘स्वच्छता दिवस’ उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता विकास आमोदकर
रावेर (प्रतिनिधी):
येथील सौ. कमलाबाई एस. अगरवाल गर्ल्स हायस्कूल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ तसेच ‘स्वच्छता दिवस’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मैदानावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त आणि हिरिरीने सहभाग घेतला.
यासोबतच शाळा परिसरात ‘स्वच्छता पंधरवडा/स्वच्छता दिवस’ अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ व सुंदर राखण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या सौ. एच. एस. कोल्हे, उपमुख्याध्यापक आर. एल. तायडे, पर्यवेक्षक एम. जी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाची प्रमुख उपस्थिती व सक्रिय सहभाग लाभला.
स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या व सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थिनींचे प्राचार्या सौ. एच. एस. कोल्हे व उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




