लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त सोहळ्यातील जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेच्या कला शिक्षिका ए. डी. भोळे यांनी रेखाटली आमदार साहेबांची आकर्षक रांगोळी.

लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त सोहळ्यातील जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेच्या कला शिक्षिका ए. डी. भोळे यांनी रेखाटली आमदार साहेबांची आकर्षक रांगोळी.
खान्देशचे ज्येष्ठ नेते व लोकनेते एकनाथरावजी खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी पदार्पणाचे औचित्य साधून जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथील कला शिक्षिका ए. डी. भोळे यांनी रांगोळीच्या माध्यमातून नाथाभाऊंचे अत्यंत हुबेहूब आणि अप्रतिम रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन केले आहे. या कलाकृतीतून त्यांनी नाथाभाऊंना अमृत महोत्सवाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या भव्य रांगोळीमध्ये लोकनेते नाथाभाऊ खडसे यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व अतिशय बारकाईने साकारण्यात आले आहे. सोबतच, डाव्या कोपऱ्यात आदिशक्ती मुक्ताईची सुंदर प्रतिमा रेखाटण्यात आली असून, खाली “लोकनेते नाथाभाऊ अमृत महोत्सव” असे आकर्षक अक्षरांत लिहिले आहे. रांगोळीच्या चारही बाजूंनी पानाफुलांची नेत्रदीपक आरास करण्यात आल्यामुळे ही कलाकृती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.या आनोख्या कलाविष्कारातून शुभेच्छांबद्दल
कला शिक्षिका ए. डी. भोळे यांच्या या कल्पक आणि उत्कृष्ट कलागुणांचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.



