घरगुती गॅस चा उपयोग चहा कॅंटींगसाठी शेलुबाजार येथील धक्कादायक प्रकार चहा कॅंटींगवर आरोग्यास हानिकारक असलेल्या तंबाखुच्या पुड्या सुद्धा लटकविलेल्या

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
दिनांक 7/10/2024
मंगरूपीर : – मंगरूळपीर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणुन सुप्रसिद्ध असलेली शेलुबाजार येथे चहाच्या कॅंटींगसाठी ईंडीयंन घरगुती गॅस सिलेंडर चा उपयोग मागील अनेक दिवसापासुन खुलेआम सुरु आहे त्यामुळे यांना भय कुणाचे की आशिर्वाद म्हणावा हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे या बरोबर आरोग्यास घातक असलेल्या तंबाखुच्या पुड्या सुद्धा लटकविलेल्या दिसत आहेत. त्यामुळे याबाबतीत सुद्धा आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच चहा साठी वापरण्यात येणारे दुध सुद्धा 5 गंजामध्ये उघडे ठेवलेले स्पष्ट दिसत असुन त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार हा शेलुबाजार मध्ये खुलेआम सुरु असुन संबंधित विभागाने तातडीने योग्य कारवाई करावी असी मागणी नागरिका कडून होत आहे.





