सामाजिक

नागपूर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील समता सैनिक दलाचे सैनिक देणार सुरक्षा :-(तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 68 वां वर्धापन दिन पावन दीक्षाभूमीवर 12 ऑक्टोबरला मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे दीक्षाभूमीवर सन 1956 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी च्या ऐतिहासिक दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिवशी पाच लाखाहून अधिक बौद्ध अनुयायांना बौद्धधम्माची दीक्षा दिली होती, त्या दिवसापासून ते आज पर्यंत प्रत्येक वर्षी समता सैनिक दलाचे सैनिक त्या ठिकाणी सुरक्षा देत असतात तसेच दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची सुरक्षा त्यांची व्यवस्था त्यांची सहायता समता सैनिक दलाचे सैनिक चोखपणे बजावत असतात त्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावचे भूमिपुत्र समता सैनिक दल जळगाव शाखा G O C वीरू भीमराव हिरोळे , ट्रेनिंग चीफ नितीन सावळे, हे जिल्हाभरातील समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना घेऊन नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी सुरक्षा देत असतात त्यांच्या समवेत समता सैनिक दलाचे कमांडर योगेश जाधव, समता सैनिक दलाचे तालुकाप्रमुख मयूर वानखेडे, निखिल बाविसाने, रोशन हेरोळे, कुणाल पालवे ,सौरभ हेरोळे, तेजस झाल्टे ,सुमित हेरोळे, संकेत हेरोळे, प्रशांत झाल्टे ,अक्षय इंगळे, शुभम पालवे ,मयूर धुंदले, करण वानखेडे, यश गवई, आयुष्य हिरोळे, पियुष हिरोळे, आकाश हिरोळे ,आकाश रायपुरे, पारस हिरोळे, सचिन हिरोळे, दीपक हिरोळे,आकाश वानखेडे, दीपक तायडे, रवी हिरोळे ,राष्ट्रपाल धुरंदर, निलेश वानखडे, अर्पित इंगळे, प्रेम वानखेडे, योगेश जाधव, पिनेश झाल्टे, निशांत झाल्टे, करण वानखेडे, रोशन वानखेडे ,शुभम पालवे, अमोल देवरे, अशी सर्व समता सैनिक दलाची सैनिक सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी सुरक्षा देण्यासाठी नागपूर रवाना होणार आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button