“वडप येथे तंटामुक्ती अध्यक्ष अंभोरे यांची अविरोध निवड “वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड

मालेगाव : – दि. 31/8/2024 रोजी मालेगाव तालुक्यातील वडप गावातील तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करण्यासाठी आमसभा बोलावण्यात आली.हि सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.त्यानूसार तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्यासाठी या विषयावर चर्चा करण्यात आली त्यानूसार तंटामुक्ती अध्यक्ष निवडीकरिता ग्रामपंचायत ला तीन अर्ज प्राप्त झाले होते. त्या मधील ओमप्रकाश सुरेश गायकवाड, अजय रुस्तम अंभोरे, राहुल रामराव गायकवाड, यांचे अर्ज प्राप्त होते. त्यामधील ओमप्रकाश सुरेश गायकवाड यांनी अर्ज स्वइच्छेने माघारी घेतला त्यानंतर अजय रुस्तम अभोरे व राहुल रामराव गायकवाड या दोघांमध्ये मतदान करण्यात आले.
यासाठी अजय रुस्तम अंभोरे यांचे नाव सर्वानुमते निवड अविरोध झाली व सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच शांततेत हि सभा पार पडली.असे ग्रामपंचायतचे सचीव श्री लोखंडे यांनी बोलतांना सांगितले. सरपंच सौ प्रयाग बाई स. व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा व निवड करण्यात आली, यावेळी भगवान बोरकर, गणेश मापारी, विजु गायकवाड,आणी गावातील जेष्ठ ,तरुण सर्वच समाजातील मंडळी यावेळी उपस्थित होती.



