जळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

वंचित बहुजन आघाडीची मुक्ताईनगर विधानसभा आढावा बैठक उत्साहात संपन्न


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) –
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक, बहुजन हृदयसम्राट, ॲड. श्रध्देय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर (साहेब) यांच्या प्रेरणेतून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या, न्यायाच्या व बंधुतेच्या विचारधारेवर आधारित सामाजिक-राजकीय चळवळीच्या मार्गदर्शनाखाली, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशिक नगर, मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक उत्साहात पार पडली.

ही बैठक वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मा. शमीभा ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुका अध्यक्ष आयु. दिलीप डी. पोहेकर आणि सहसचिव विश्वनाथ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे “अंतुर्ली” जिल्हा परिषद एस.सी. राखीव जागेचे अधिकृत उमेदवार व ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. आयु. एस. एस. तायडे (सर) यांनी घेतलेली उमेदवारांची चाचपणी व मार्गदर्शन सत्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार धोरण, आणि संघटनात्मक बळकटी यावर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत जिल्हा अध्यक्षा मा. शमीभा ताई पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की,

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारी वंचित बहुजन आघाडी कोणत्याही घराणेशाही, हुकुमशाही आणि सरंजामशाहीच्या विरोधात लढणार आहे.
जनता, समाज आणि संविधान यांच्या बळावर आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून परिवर्तनाचा झेंडा फडकवू.”

तसेच त्यांनी स्पष्ट केले की,

“RSS-प्रणीत BJP-शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून इतर सर्व प्रगतिशील व सामाजिक न्यायवादी पक्षांशी VBA युतीस तयार आहे.”

या बैठकीस VBA तालुका उपाध्यक्ष आयु. विठ्ठल भाऊ कोळी, कोषाध्यक्ष वसंत दादा लहासे, तालुका महासचिव आयु. संजय धुंदले, प्रसिद्धी प्रमुख आयु. संजय म्हसाने, संघटक रविंद्र चव्हाण, संजय माळी, सुनिल भिल्ल, गौतम धुंदले, महेंद्र शिरसाट, संतोष इंगळे, पंडीत महाले, भागवत चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचा समारोप “जय भीम – जय भारत” या घोषणांनी झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button