खडसे महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्ताने “आत्महत्या प्रतिबंध व समुपदेशन”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी मुक्ताईनगर
विद्यार्थ्यांनो सहनशीलता बाळगा – प्रा.पी.पी. लढे
श्रीमती जी जी खडसे महाविद्यालयात आत्महत्या दिनानिमित्ताने मानसरंग क्लब व समूपदेशना केंद्रा मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. पी. पी .लढे हे होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सहनशीलता बाळगावी स्वतःच्या आत्मविश्वास प्रगल्भ करून यशाचे शिखर हे गाठले पाहिजे. आपल्याला कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या, जबाबदाऱ्या कराव्या लागणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एच. ए. महाजन सर हे होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व घडवत असताना आपल्यामध्ये सहनशीलता अपयश पचवण्याची ताकत असली पाहिजे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.छाया ठिंगळे यांनी केले. कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए .पी .पाटील हे होते. तसेच समुप देेशन केंद्राचे सर्व सदस्य उपस्थित होते. वाणिज्य विभागाच्या झामरे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमा चे आभार प्रा.डॉ. आर. डी .येवले यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्याने विद्यार्थी उपस्थित होते.



