महाराष्ट्रविदर्भ
“शिक्षक सहकारी संस्थेत आमसभेनिमित्त शिक्षकांचा सेवापुर्तीचा संपत्नीक सत्कार”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये मा.नामदार प्रतापरावजी जाधव केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार व वाशिम- यवतमाळचे खासदार संजय देशमुख, आमदार अमित झनक रिसोड मालेगाव मतदारसंघ, आमदार किरणराव सरनाईक विधान परिषद सदस्य, विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना, या मान्यवरांनी रिठद येथील रहिवासी विजय तुळशीराम बोरकर यांनी ऐच्छिक पेन्शन घेऊन आपली सेवापूर्ती पूर्ण केली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक विजय बोरकर यांचा सपत्नीक मान्यवरांनी सत्कार केला.




