महाराष्ट्रविदर्भ

शहरात वाढले अवैध व्यवसायाचे प्रस्त, अवैध धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उद्ध्वस्त

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगावीच्या दरबारी अवैध धंद्याकडे पोलीसाचा कानाडोळा

शेगाव शहरात ताजी वरली, वरली

मटका, तितली भवरा, लुडो यासारख्या जुगाराच्या धंद्यांना ऊत आल्याचे चिंताजनक चित्र निदर्शनास येत असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. किकेटच्या सामन्यावर सुध्दा सट्टाबाजार जोमात सुरू आहे. विविध ठिकाणी मटक्याचे आकडे घेणे सुरूआहे तर आठवडी बाजारात खुलेआम ताजी वरली खेळविल्या जात आहे. या झटपट श्रीमंत करणा? या फसव्या खेळाकडे युवक आकर्षित होत असल्याने

पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर आथीक झळ पोहचलेल्या युवकांकडून हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यावर सुध्दा शहरात अनेक सटोडिये सौदा घेत आहेत. सर्वसामान्य जनतेला हे सर्व अवैध प्रकार दिसत असतांना पोलीसांना हे दिसू नये याचे सुज्ञ नागरीकांकडून आश्? चर्य व्यक्त होत आहे. युवकांना वाईट मागीने जाण्यासाठी प्रवृत्त करणारे हे अवैध धंदे बंद व्हावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांकडून केली जात आहे. गेल्या काही वर्षात

तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस

विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button