गुन्हेगारी

नवी मुंबईत तरुणीची हत्या.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर दि 28/07/2024 नवी मुंबई कोपरखैरणे येथील अक्षता म्हात्रे आगास्कर या विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी केल्याची घटना ताजी असताना नवी मुंबईतील उरण येथे 22वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. उरण हायवे च्या बाजूला तिचा मृतदेह आढळून आला.यशश्री शिंदे अस तरुणीच नाव आहे. तरुणी दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती.दाऊद शेख यावर तिच्या वडिलांनी आरोप व्यक्त केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना झाली हे लक्षात आले ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरण मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button