महाराष्ट्र

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर अज्ञांताकडून दगडफेक ; व्हिडीओ व्हायरल

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

१३ जुलै २०२४ खान्देशातून गुजरात राज्यात जाणाऱ्या भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर रेल्वेची साखळी खेचून सुमारे अर्धा तास रेल्वे थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी सुरु झाली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू त्या उरूसच्या ठिकाणी जाण्यासाठी बसले होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली. सुमारे अर्धा तास दगडफेक झाल्याचे कळते आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button