Uncategorized

खासदार अनुप धोत्रे ॲक्शन मोडवर: उपोषणाची सांगता…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – मालेगाव येथील तहसील कार्यालय समोर १० जुलै २०२४ मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२,१४ आणि १७ मधील रस्त्यांच्या निष्कृष्ट कामाविरोधात सुरू असलेल्या उपोषणाची आज सांगता झाली. भाजपा कार्यकर्ते सुनिल श्रीरामजी शर्मा यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला दोन दिवस झाले असता, खासदार अनुप धोत्रे ॲक्शन मोडवर येत त्यांनी त्वरित दखल घेतली खासदार धोत्रे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना फोन करून तातडीने आदेश दिले त्यांनी सांगितले की, संबंधित रस्ता दोन दिवसांमध्ये चालू होणार असून त्यावर तीन इंची कोट सिमेंट काँक्रेट टाकण्यात येणार आहे. या उपोषण सोडवण्याच्या कार्यक्रमात अकोला लोकसभेचे खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या हस्ते उपोषणकर्त्याला मँगो ज्यूस देऊन उपोषण सोडण्यात आले या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ मुंढे,तालुका अध्यक्ष गजानन नवघरे,तानाजी पाटील,गणेश कुटे पाटील,अनिल सोळंके,डॉ.उमेश तारे,संतोष भाऊ तिखे,राजू सांगळे, गजानन काळे,आणि अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली खासदार अनुप धोत्रे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे या उपोषणाची सांगता झाली असून,रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे या कार्यक्रमाने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल नव्या आशा निर्माण केल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button