अकोला ते चोहोट्टा बाजार पारळा तेल्हारा मार्ग बस सुरु करणारे पुर्णाजी खोडके यांचा पारळा ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार…..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
तेव्हारा: अकोला चोहोट्टा पारळा भाबेरी तेल्हारा एसटी बस सेवा ही ५ महिन्यापासुन अनेक कारणांमुळे,व रस्त्या चे काम झाल्या नंतर खुप अडचणी येत असल्यामुळे शाळेतील नागरीकांना, अपंग व निराधार लोकांना तसेच शेतकरी वर्गाला सदर रस्त्याने वाहन भेटत नसल्यामुळे पायी प्रवास करावा लागत होता. पारळा वरुन विद्यार्थी चोहोट्टा बाजार येथे शाळांमध्ये पाही यावे लागत होते.व उन्हाळयाच्या दिवसामध्ये प्रवासी वर्गाचे हाल होते, आणि असे सांगण्यात येत होते की, गेल्या दोन महिन्यापासुन भांबेरी येथील मुख्य रस्त्याचे सिमेंट काम सुरु असुन त्यामुळे बस सेवा सदर मार्गाने सुरु होवु शकत नाही. असे ऐकण्यास येत आहे.आणि गेल्या दोन महिन्यापासुन काही कारणास्तव सदरील भांबेरी येथे रस्त्याचे काम रखडलेले आहे. परंतु ते सदरील काम एक खूप दिवस झाल्यानंतर हे चालू होत . नव्हते या संदर्भात अकोला ते चोहोट्टा मार्गे पारळा-तेल्हारा बस फेरी सुरु करण्यात यावी या मार्गावर अनेक अडथळे होते… भांबेरी येथील मुख्य रस्त्यावरील काम तसेच लाईनचे काम लाईनचे मध्ये आलेले फोन अनेक सारे अडथळे.होते यासंदर्भात टी महामंडळ व संबंधित अधिकारी यांच्याकडे मागणी करून व पाठपुरावा करून खोडके यांनी त्यांच्या प्रयत्नाला आले व एसटी महामंडळ सेवा ही सुरू झाली…. एसटी बस सेवेकरिता सतत परिश्रम घेऊन अनेक परिश्रमाला समोर जाऊन अनेक अडथळ्याला समोर जाऊन. पाठपुरावा करून मागणी करून,. एसटी बस सेवा ही सुरू करणारे.. एसटी बस सेवा ही सुरू करणारे. रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष. पूर्णाजी खोडके यांचा शाल व हार घालून. सत्कार व एसटीचे पूजन हार घालून. मिठाई सोनपापडी चा वाटप करून.खोडके यांचा सत्कार व एसटी महामंडळाचे चालक वाहक यांचा सत्कार पारळा सरपंच निखिल कडू उपसरपंच दादाराव गवई
पोलिस पाटील नाजुक्राव घाटोळ
माजी सरपंच सुमेद बागलकर ,
रुग्णसेवक जीवन नागे , राणा गावंडे,गोपाल महाराज साळुंके, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राजु शाह,गणेश महाले. रयत शेतकरी संघटनेचे प्रकाश गवई,सह ग्रामस्थ सह विद्यार्थी शेतकरी बांधव उपस्थित होते…..



