महाराष्ट्रविदर्भ

२०२४ च्या”विधानसभा निवडणुकी संदर्भात,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, रिसोड तालुक्याची आढावा बैठक संपन्न”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्याचे संपर्कप्रमुख दिलीपरावजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर ,कॅप्टन प्रशांत सुर्वे लोकसभा संघटक, गजाननराव देशमुख जिल्हा संघटक,डॉ .चंद्रशेखर देशमुख, विश्वनाथ सानप यांच्या मार्गदर्शनात रिसोड येथे दि.९ जुलै दु.१ वा.विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत संदर्भात रिसोड येथील विश्वा लाॅन येथे आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी सर्व मान्यवरांचे शाल व पुष्प देऊन स्वागत पदाधिकारी यांनी केले.यावेळी संपर्कप्रमुख यांनी बोलतांना सांगितले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी सजग राहावे. निवडणुकीत युती होईल, किंवा नाही हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक पदाधिकाऱ्यांना गटप्रमुख, बूथ प्रमुख यांची संपूर्ण नेमणूक झाली पाहिजे. नसेल झाली तर ती करून घेणे. जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब घेतील व इतरही अन्य सूचना मार्गदर्शन करतांना संपर्कप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.रिसोडची जागा शिवसेना पक्षासाठी मी मागणी करेल असेही बोलताना यावेळी सांगितले.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ.सुभाषराव मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मडके, रिसोड तालुकाप्रमुख नारायणराव आरु,घनश्याम मापारी ता.समन्वयक, सुभाष बोरकर विधानसभा समन्वयक,आनंद कुलाळ तालुका संघटक,गजानन सानप युवासेना तालुका प्रमुख, गणेश देशमुख उपजिल्हाप्रमुख युवासेना, हेमंत घोडे रिसोड विधानसभा अधिकारी, गजानन खोडके उपतालुकाप्रमुख, प्रकाश तात्या चोपडे, समाधान काठोळे, डॉ.जगन्नाथ कावरखे, भगवान वाकुडकर,मनोज चौधरी, नाना देशमुख,अन्ना देशमुख वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष,भारत गवळी, लक्ष्मण शिंदे, शिवाजी सोनुने, सुनील नागरे, बळीराम चोपडे, परमेश्वर चोपडे,खंडू वानखेडे,पवण सदार, पुरुषोत्तम मोरे,मो.हाफीज मो.कासम, इत्यादीसह अनेक शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी तालुक्यातील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गजानन सानप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश तात्या चोपडे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button