जळगावा जिल्हा

जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न


जळगाव | प्रतिनिधी
जिल्ह्यातील गौणखनिज विशेषतः वाळू उत्खनन प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालणे तसेच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दि. २२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू उत्खनन प्रक्रियेचा सखोल आढावा घेण्यात आला. शासनमान्य व परवानगीप्राप्त वाळू घाटांची स्थिती, उत्खननाची कार्यपद्धती तसेच महसूल मिळकतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध उत्खनन व अनधिकृत वाहतुकीच्या तक्रारींवर गंभीरपणे दखल घेत संबंधित यंत्रणांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले.
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग व इतर संबंधित यंत्रणांमध्ये अधिक समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला. नियंत्रण पथकांची कार्यक्षमता वाढविणे, क्षेत्रनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करणे तसेच गस्त व तपासणी अधिक प्रभावी करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे, सातत्याने निरीक्षण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सक्षम करणे आणि दोषींवर कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
बैठकीअंती उपस्थित सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना नियमानुसार व वेळेत कार्यवाही सुनिश्चित करण्याबाबत प्रशासकीय सूचना देण्यात आल्या. वाळू संसाधनांचे शाश्वत, नियमनबद्ध व पारदर्शक व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button