मातंग समाजाच्या अपंग व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा भव्य मोर्चा काढणार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम – : स्थानिक मौजे एकांबा येथील मातंग समाजाच्या महिला सौ.कांचन ताई डोंगरे ,त्यांचे अपंग पती माधव डोंगरे आणि मुलगा गणेश डोंगरे यांनी गावातील काही गाव गुंडांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली.यावेळी त्यांच्या सासूबाई पार्वताबाई डोंगरे या 70 वर्षीय वृध्द महिलेला सुद्धा जबर मारहाण करण्यात आली.या वेळी सदर आरोपींनी या महिलेच्या घरात घुसून कुऱ्हाड , दगड , सब्बल तसेच जड हत्यार घेऊन जबर मारहाण केली . त्यांच्या घराचे दरवाजे कुऱ्हाडीने आणि दगडाने फोडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.तरी या आरोपींचे कोंबींग करून त्यांची तात्काळ धरपकड करावी ,त्यांच्यावर कलम 307,कलम 354 कलम लावावी अन्यथा ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना ( AIBTS ) तर्फे अनसिंग पोलीस स्टेशन आणि वाशीम कलेक्टर ऑफिसवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे अध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी दिला आहे.
सविस्तर बातमी अशी की, अनसिंग पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असणाऱ्या एकांबा येथे मातंग समाजाच्या महिला सौ.कांचन माधव डोंगरे ,त्यांचे अपंग पती माधव डोंगरे,त्यांच्या वृध्द सासूबाई पारवताबाई डोंगरे ,मुलगा लक्षण डोंगरे यांना गावातील काही गावगुंडांनी शुल्लक कारणावरून घरात घुसून जबर मारहाण केली.त्यांना कुऱ्हाड, दगड आणि लोखंडी रॉडने तसेच लाथा बुक्यानी जबर मारहाण केली.यामध्ये वृध्द महिला पारवता बाई डोंगरे यांच्या हाताला जबर मारहाण केली यात त्यांचा हात फॅक्चर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी या घटनेचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे अध्यक्ष जगदीश मानवतकर सर यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय वाशीम येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटुन सदर प्रकरण गंभीर आहे तरी आपन या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावे अन्यथा ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना तर्फे कलेक्टर ऑफिसवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे प्रसिध्दी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.तसेच या प्रकरणात पीडितांना न्याय मिळावा या साठी जगदिश मानवतकर हे लवकरच अनसिंग येथे भेट देणार आहेत.यावेळी AIBTS चे जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड ,जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ इंगोले , विभागीय अध्यक्ष दिलीप भाऊ गायकवाड ,वाशीम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख वैभव इंगोले ,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख देवा भाऊ गवळी , रिसोड तालुका अध्यक्ष ओमकार गवई वाशीम तालुका अध्यक्ष नितीन बांगर , माजी जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ ठोके , माजी जिल्हा उपाध्यक्ष गौतम यांची उपस्थिती होती.यावेळी जगदिश मानवतकर सर विचार मंच वाशीम च्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बहुसंख्येने उपस्थिती होती.



