स्वाभिमानीच्या दणका अनुदानित हरबरा बियाणे वाटपाला सुरवात.

29 ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषण दिला होता ईशारा .
स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
रब्बी हंगामाला सुरवात झाली असून कृषी विभागा मार्फत अनुदानित हरबरा
वाटपला सुरवात होत नसल्याने शेगाव तालुक्यातील हरबारा उत्पादक शेतकरी चिंता ग्रस्त होता.हरबरा पेरणीचा अनुकूल वेळ निघून जात असल्या मुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या आदेशावरून तालुका कृषी विभागाला स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून निवेदना द्वारे आमरण उपोषणाचा ईशारा देण्यात आला होता. 29 ऑक्टोबर रोजी कृषी विभागाच्या परिसरात आमरण उपोषण सुरवात करू असे त्यांनी निवेदनात नमूद केले होते. अश्यातच तालुका कृषी विभागाची तारंबळ उडाली होती. समस्याची गंभीर्ता लक्षात घेत. कृषी विभागा कडून अंत्यता अनुदानित हरबरा बियाणे वाटपास सुरवात करण्यात आली आहे . त्या मुळे शेगाव तालुक्यातील हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानित हरबरा बियाण्याचा लाभ घ्यावा असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून करण्यात आले आहे.



