विशेष अधिवेशन बोलवण्यास आदेशित करून मराठा समाजाच्या या वर्षानुवर्ष प्रलंबित आरक्षणाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजास न्याय देण्यात यावा

*विशेष अधिवेशन बोलवण्यास आदेशित करून मराठा समाजाच्या या वर्षानुवर्ष प्रलंबित आरक्षणाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजास न्याय देण्यात यावा अशी आमदार राजेश एकडे यांनी थेट राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या कडे ईमेल द्वारे करीत मलकापूरातील साखळी उपोषण सुरू केलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेत संवाद साधला.* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज इतर मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्वतंत्र आरक्षणाच्या मागणी करता सतत उपोषण व आंदोलने शांततेच्या मार्गाने करीत आहेत. परंतु राज्य शासनाच्या वेळ काढू धोरणामुळे मराठा समाजाला अद्याप पर्यंत आरक्षण रूपी हक्क मिळालेला नाही.सद्यस्थितीत मराठा समाजाच्या रास्त मागणीसाठी आमदार राजेश एकडे यांनी मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. तर गेल्या सहा ते सात दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय खालावली असून राज्यभरात याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. तरी आरक्षण प्रश्नसंदर्भात आपण स्वतः हस्तक्षेप करून राज्य शासनास विशेष अधिवेशन बोलवण्यास आदेशित करून मराठा समाजाच्या या वर्षानुवर्ष प्रलंबित आरक्षणाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजास न्याय देण्यात यावा अशी मागणी आमदार राजेश एकडे यांनी राज्यपाल यांच्या कडे केली आहे. या संदर्भात सुद्धा आमदार एकडे यांनी मलकापूरातील साखळी आंदोलन कर्ते समाज बांधवांना अवगत केले.



