शेगांव शहर पोलिसांनी केली दारूबंदी कारवाही

शेगांव शहर पोलिसांनी केली दारूबंदी कारवाही
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव
प्रतिनिधी श्याम पहुरकर
दारूबंदी कायद्या अंतर्गत राबवली विशेष मोहीममिळालेली माहिती अशी की शेगाव शहर पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाईसाठी विशेष मोहीम राबवली 12/00 वाजता सुमारास आरोपींना सुनील विजय तुंमे वय 32 वर्षे राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शेगाव याच्यावर दारूबंदी कायदा अंतर्गत छापा कारवाई केली असता त्याच्याजवळ टॅंगो कंपनीच्या 90 एम एल च्या दारूच्या कंपनी सिल बंद असलेल्या 34 शीशा प्रत्येक किमती 35 रुपयाप्रमाणे एकूण 1190 रुपयांचा व एक वायरची थैली किंमत दहा रुपयांचा असा एकूण 1200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच 11: 25 वाजता सुमारास आरोपी नामे पियुष प्रमोद ओवे वय 22 वर्षे राहणार आंबेडकर चौक शेगाव याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शेगाव येथे त्याचे राहते घराजवळ सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा कारवाई केली असता त्याच्याजवळ 90 एम एल च्या देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या सीलबंद 32 नग शीशा प्रत्येकी किमती 35 रुपये प्रमाणे 1120 रुपयाचा व एक वायरचे थैली किमती 10 रुपयाचा असा एकूण 1130 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच 11/00 वा सुमारास आरोपी रवींद्र पांडुरंग सोनार व 43 वर्षे राहणार राम नगर जिल्हा जळगाव खान्देश हल्ली मुक्काम कश्मिरा हॉटेल शिवाजी चौक याचेवर दारूबंदी कायद्यांतर्गत छापा कारवाई केली असता त्याचे जवळ देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल कंपनीच्या 36 शीशा प्रत्येक किमती 35 रुपये प्रमाणे एकूण 1260 रुपयांचा व एक वायर थैली किमतीत दहा रुपयांची असा एकूण 1270 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. प्रकरणी त्यांनी आरोपीतांवर कलम 65 ड महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून अंदाजे 3600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक निलेश घाडगे यांच्याकडे देण्यात आला. शेगाव शहर पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धावे दनानले आहे



