सानंदाजी काँग्रेसचे “यत्र तत्र सर्वत्र” सरकार असतांना मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस आघाडी सरकारने काय केले ? – संजय शिनगारे

स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि रामा इंदोरे
आपली गल्ली पासून दिल्ली पर्यत सत्ता असतांना आपण केवळ आपले सर्व सावकारी प्रकरण सेट करुन घेतले.
खामगाव:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठचार्ज केला ही घटना निंदनीय आहे. या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो व निलंबनासह त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपा जिल्हा सचीव तथा खामगांव विधानसभा निवडणुक प्रमुख संजय शिनगारे यांनी केली आहे. 2014-2019 भाजपाची सत्ता असतांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठा समाजाचे अतिभव्य़ असे मोर्चे निघाले त्या मोर्चांसाठी तत्कालीन सरकारला कोणताच मोठा बंदोबस्त़ लावावा लागला नाही किंवा या महामोर्चात कोठेही गालबोट लागल नाही. तसेच त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असतांना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. ते भाजपा सरकार सत्तेत असतांना उच्च् न्यायालयाने कायम ठेवले. त्यानंरत सर्वोच्च् न्यायालयाने देखील या प्रकरणी सकारत्मकता दर्शवली परंतु त्यानंतर आलेल्या उध्द़व ठाकरे व शरद पवार यांच्या काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठा समाजाची बाजू मांडायला सरकारला वेळच मिळाला नाही. वेळोवेळी सर्वोच्च़ न्यायालयाने सांगून सुध्दा महाविकास आघाडी सरकारचे वकील जाणीवपुर्वक सुनावणी दरम्यान गैरहजर राहत होते. तसचे सर्वोच्च़ न्यायालयाने मागीतलेले दस्तावेज देण्यास देखील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. योग्य़ रितीने बाजू न मांडल्यामुळे शेवटी सर्वोच्च़ न्यायालयात आराक्षण टिकल नाही. महाविकास आघाडी सत्तेतील काँग्रेस राष्ट्रवादी काँगेसची काम करण्याची पध्दतीच ही आहे कोणतेच काम करायचे नाही जनतेला त्यांच्या प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवायचे यामुळे राज्यात अनेक वर्ष शरद पवार व काँग्रेसची सत्ता असतांना मराठा समाज आरक्षणापासून वंचीत राहिला.
सांनदाजी आपण म्हणतात की, मराठा समाजावर लाठीचार्जची घटना घडली असे म्हण़त असतांना आपला इतिहास आपण थोडा आठवावा. खामगांवचे आमदार असतांना तुम्ही दंगलीत मराठा समाजातील शेकडो निर्दोष तरुण व महिलांना या दंगलीच्या गुन्हयांत अडकविले हे मराठा समाज विसरला नाही विसरणारपण नाही. त्यामुळे आजचे आपले मराठा समाजाच्या आरक्षणाबददलचे बोल हे केवळ नौटंकी आहे.
राहिला प्रश्ऩ बुलढाणा जिल्हयातील व खामगांव मतदार संघातील बळीराजाच्या दुष्काळी परिस्थितीचा तर त्यांना न्याय दयायला खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा सक्षम आहेत. शेतकऱ्यांना योग्य़ न्याय भारतीय जनता पार्टीच देऊ शकते हे शेतकऱ्यांना देखील माहित आहे. सानंदा परिवाराच्या सावकारीने बळीराजाच्या तोंडचा घास हिसकावला आहे हे सर्वश्रृत आहे. आपण यत्र तत्र सर्वत्र आपल्या पक्षाची सत्ता असतांना मराठा, ओबीसी समाजातील शेतकऱ्यांच्या सांनदा परीवारा विरुध्दच्या सावकारी तक्रारी दाबण्यासाठीच आपल्या सत्तेचा वापर केला. देशाच्या इतिहासात ही नोंद आहे की सावकार सानंदाच्या सावकारी प्रकरणात 10 लाखाचा दंड सरकारला भरावा लागला आहे. त्यामुळे बळीराजासाठी आपण पुतणा मावशीच्या प्रेमाचा आव आणु नये.
जिल्हयात दुष्काळी परिस्थिती असतांना खामगांव शहरात फटाके फोडण्यात आले, डिजे लावण्यात आले. महाशय तुम्ही सध्या काँग्रेसमध्ये अडगळीला टाकल्या गेले आहात. तुम्हाला तुमच्या काँग्रेसचे काय सुरु आहे हे देखील माहित नाही. काँग्रेस हा पक्ष I.N.D.I.A. या गठबंधन मध्ये सहभागी झाला. विशेष म्हणजे या गठबंधनच्या मुंबईतील फाईव्ह़ स्टार हॉटेलमध्ये तुमचे युवराज राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. तिथे या सर्व नेत्यांनी राहण्यासाठी व बैठकीसाठी एका दिवसाला कोटयावधी रुपयांचा खर्च केला. आमचे नेते आम जनतेत असतांना तुमचे नेते आले व कोटयावधी रुपयांचा खर्च करुन बैठका घेऊन चालले गेले. त्यात “ना मराठा आरक्षण देण्याबाबत चर्चा झाली नाही, ना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्यातील दुष्काळाबाबत” कोणती चर्चा झाली. स्वत़:च्या परिवाला सत्तेची फळे यापुढेही मिळत रहावी यासाठी हा सर्व कार्यक्रम I.N.D.I.A. या गठबंधनातील सर्व पक्षांचा सुरु आहे.
तुमची जी अवस्था आहे तीच अवस्था तुमच्या पक्षांची राज्यात व देशात आहे. अडीच वर्ष महायुतीत काँग्रेस सत्ते असतांना काँग्रेसला बोलायचे अधिकार नव्हते. काँग्रेस गळयातील लोढण्याप्रमाणे त्या आघाडीत सहभागी होती. काढताही येत नाही आणि पळताही येत नाही अशी अवस्था काँग्रेसची आहे. I.N.D.I.A. गठबंधनची बैठक संपन्न् झाली यात समन्व़यन समितीत “उध्दव़ बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संजय राऊत आणि राष्ट्रवादी पवार गटातर्फे शरद पवार यांचा समावेश झाला काँग्रेसच्या हाती धुपाटण दिल. आता तर म्हणे काँग्रेसला लोकसभेच्या केवळ 8 जागाच मिळणार आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला राज्याच्या राजकारणात स्थान नाही विधानसभा निवडणुकीतून पळालेल्या सानंदांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या वल्गना करु नये.
याउलट सन 2014-19 च्या भाजपाच्या सत्तेत मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण मिळाले. आरक्षण रदद झाल्यानंतर सारथी व इतर संस्थांच्या माध्यमातून स्प़र्धा देणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक व आर्थीक पाठबळ दिले. शैक्षणिक फी मध्ये 50 टक्के सवलत मिळावी यासाठी मराठा समाजाचा इ.डब्ल्यु.एस. मध्ये समावेश करुन मोठा दिलासा देण्याचे काम तत्कालीन फडणवीस सरकारने केले. यासोबतच सारथी या संस्थेला मोठया प्रमाणात आर्थीक पाठबळ देऊन कोटयावधीचा निधी मंजूर केला. अण्णा साहेब पाटील आर्थीक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवक, युवती, व्यावसायीक उद्योजक, यांना देण्यात येणार कर्ज सुलभ करुन मोठया प्रमाणात कर्ज वाटप करुन त्यांना आर्थीक पाठबळ देऊन स्व़त:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली.
याउलट महाविकास आघाडीच्या काळात या सर्व संस्था कशा बंद पडतील व मराठा समाज पुन्हा डबघाईस जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे काम तत्कालीन उध्द़व ठाकरे व शरद पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारने केले.
आता पुन्हा राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आले व मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी पुन्हा मराठा समाजाच्या संस्थांना मोठया प्रमाणात निधी देऊन उभारी दिली आहे. मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण देखील महायुती सरकारच मिळवून देईल हे देखील सत्य़ आहे आणि याचा मराठा समाजाला विश्वास आहे. मराठा समाजाचा विश्वासघात करणारे आज महाविकास आघाडीचे नेते विरोधी बाकावर आहेत हे सर्व मराठा समाजाला माहित आहे तसेच मराठा आरक्षणातील झारीतील शुक्राचार्यांनी महाविकास आघाडी सत्तेत असतांना काय केल हे देखील मराठा समाजाला माहित आहे.



