बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरीप हंगामामध्ये आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव

या वर्षीच्या खरीप हंगामात वेळेवर झालेल्या समाधानकारक पावसामुळे खामगांव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीच्या कामांना वेग दिला असून शिवारात सर्वत्र शेतीकामांची लगभग सुरु आहे.
या वर्षी अनेक शेतकरी उडीदऐवजी सोयाबीन लागवडीला प्राधान्य देत आहेत. सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आणि हवामानाचा अनुकूल अंदाज लक्षात घेऊन अनेकांनी पीक पद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे यंदा परिसरात सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणांच्या वापर करून , संतुलित खत व्यवस्थापन तसेच रोग व कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button