खानदेशमहाराष्ट्रमुबईशैक्षणिक

शिक्षक भारती वर्धापन दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शहापुर – ( सचिन शेलवले )दिनांक 8/8/2026 रोजी मौजे कांबारे व अंदाड येथे शिक्षक भारती संघटना शहापुर व ठाणे जिल्हा यांच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम आज संपन्न झाला . त्यावेळी शिक्षक भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.सुरेश विशे सर, जिल्हा सल्लागार श्री.मधुकर नारखेडे सर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.जयवंत मोगरे सर, जिल्हा महिला संघटक श्रीमती अनिता गोसावी मॅडम, श्रीमती ललिता मगर मॅडम, श्री.शशिकांत विशे सर, श्री.राजेंद्र विशे सर,सौ.ज्योती विशे मॅडम तसेच अनेक शिक्षक उपस्थित होते. तसेच दिनांक 9/8/2026 रोजी तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय शिक्षकांसाठी शिक्षक भारती वर्धापन दिनानिमित्त शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा व विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा यांचे आयोजन शिक्षक भारती तालुका व ठाणे जिल्हा यांच्या वतीने प्रबोधन ठाकरे विद्यालय, शाळा क्र . १९ नेतीवली मेट्रो मॉलच्या मागे कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button