मीडिया कक्ष स्थापन करून उपयोग काय ?

मुक्ताईनगर प्रतिनिधी
विधानसभा मतदार संघात प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी मीडिया कक्षाची स्थापना करण्यात आली दोन दिवस या मीडिया कक्षातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांनी पत्रकारांपर्यंत व्यवस्थित माहिती पुरविण्यात आली परंतु आज तिसऱ्या दिवशी सदर मीडियातर्फे पत्रकारांना माहिती पुरविण्यात आली नाही यासंदर्भात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांना विचारणा केली असता संबंधित महिला अधिकाऱ्याला आम्ही माहिती देण्यास प्रतिबंधित केले असल्याचे सांगितले पत्रकारांना माहिती हवी असल्यास त्यांनी स्वतः येथे नोटीस बोर्डावर लावलेली माहिती दररोज घेऊन जावी असे सांगितले आतापर्यंत वृत्त देत असताना निवडणुकी संदर्भातील काही अडचणी असल्यास नेमकी विचारावी कुणाला संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य माहिती मिळत नसल्याने पत्रकारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.



