बुलढाणामहाराष्ट्र

शेतकरी समस्या वर कॉम्रेड अकबर ह्यांनी बैठकीचे आयोजन

आज दिनांक 2 जानेवारी 22 ला कवठल, कुंभरखेड,हिंगणा, पेसोडा येथील शेतकरी समस्या वर कॉम्रेड अकबर ह्यांनी बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी अतिक्रमण वन जमीन,गायरान जमीन,पीकविमा,वीज वितरण कंपनी चा मानसिक त्रास ह्यावर उत्तम चर्चा झाली.कॉम्रेड विजय पोहनकर ह्यांनी सर्व विषयावर कायदेशीर माहिती देत प्रशासन ऐकत नसल्याने पाण्याच्या टाकीवर चढून आमरण उपोषण आंदोलन केल्या शिवाय आता गत्यांतर नाही.असे सांगत अखिल भारतीय किसान सभा ही सामूहिक नेतृत्व देणारी चळवळ आहे.त्यामुळे लाल झेंडा खांद्यावर घेऊन जाती-धर्माच्या राजकारणाला तिलांजली देत आपले हक्क आपणच खेचून घेऊ असा नारा देत सर्व शेतकरी बांधवांना आश्वस्त केले.या बैठकीला जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड अनिल गायकवाड,कॉम्रेड रामेश्वर काळे,कॉम्रेड ज्ञानदेवराव तायडे,कॉम्रेड सागर पाहुरकर,कॉम्रेड अकबर कॉम्रेड ओम मुंडाले इत्यादी हजर होते.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button