शेगाव तालुका सरपंच संघटनेकडून ३ जानेवारीला ग्रामपंचायत बंद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा शेगाव तालुका सरपंच संघटनेकडून निषेध नोंदवत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये नमुद आहे की, सरपंच देशमुख यांची ता. ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ शेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये श्रद्धांजली वाहून ३ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत बंद ठेवण्यात येतील, तसेच शेगाव तहसील कार्यालयासमोर काळ्याफिती लावून मूक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच
सरपंच संरक्षणासाठी कायदा करण्यात यावा व संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच संघटना अध्यक्ष रामा पाटील थारकर, सचिव सदानंद फुंडकर, लक्ष्मण गवई भोंनगाव, पवन बरिंगे कालखेड, सुधाकर बावस्कर तरोडा डी, सौ. श्रद्धा योगेश पिसे पाडसूळ, धनराज पाटील जवळा पळसखेड, अमोल भांगे वरखेड, गजानन देविदास ससे सांगवा, संदीप किसन गवई टाकळी धारव, गोपाल बाठे सगोडा, अमोल गणेश जंजाळ, रवींद्र निवृत्ती फरफट, धोंडू किसन धेंगे जानोरी, अनंता शेळके, सत्यवान मोरखडे यांच्या सह्या आहेत



