Uncategorized

चर्च समोर अंगणवाडी मालेगाव मध्ये पोषण आहाचा जनजागर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय वाशिम नागरी प्रकल्प
अंतर्गत सप्टेंबर पासून पोषण महिन्याची सुरुवात अंगणवाडी मध्ये विविध कार्यक्रम घेऊन करण्यात आली. मा. मीनाक्षी भस्मे मॅडम बालविकास प्रकल्प अधिकारी, शुभांगी शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सविता शेजुळ अंगणवाडी सेविका यांच्या वतीने दररोज अंगणवाडी मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत, यामध्ये आरोग्याची काळजी, स्वच्छतेचे महत्व पोषणाचे महत्व ,आहाराचे महत्त्व ,बालकांची वजन उंची, घरोघरी जाऊन गरोदर मातेला भेट, त्याचप्रमाणे स्तदामातेला भेट देऊन स्तनपानाच्या 45 पद्धती समजावून सांगणे, गौरी गणपती समोर पोषण महीन्याची जनजागृती करणे इत्यादी कार्यक्रम चर्च समोर अंगणवाडी मालेगाव क्रमांक 17 च्या वतीने सविता शेजुळ अंगणवाडी सेविका पुष्पा सोनुने मदतनीस यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. कार्यक्रमाला कार्यक्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button